Sangvi : रिक्षा-कारची समोरासमोर धडक; रिक्षाचालक जखमी, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाल्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 24) मध्यरात्री बाराच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.

विनोद विष्णू कांबळे (वय 45, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद हे रिक्षाचालक आहेत. ते त्यांची रिक्षा (एमएच 14 / सी यु 1592) घेऊन गुरुवारी मध्यरात्री नवी सांगवी येथून घरी जात होते. मल्हार गार्डनजवळ आले असता एमएच 20 / बी टी 9996 या कारने विनोद यांच्या रिक्षाला समोरून धडक दिली. यामध्ये विनोद जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.