Sangvi : त्याला वसीमवर गोळी झाडायची होती पण……

एमपीसी न्यूज- वसीमने केलेल्या खुनी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी त्याने पिस्तूलही आणले होते. वसीम सांगवीत आल्याची माहिती त्याला मिळाली. मात्र तो येण्यापूर्वीच वसीम निघून गेला होता. यामुळे वसिमच्या मित्रावर त्याने गोळीबार केला. ही घटना जुनी सांगवी येथे शुक्रवारी (दि. 4) रात्री घडली.

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकिरण घुटे (वय 16) या तरुणावर शुक्रवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार केला. मात्र त्यातून घुटे हा थोडक्‍यात बचावला. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

कबुतरबाजीच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने वसिमवर खुनी हल्ला केला. तर त्याचा बदला घेण्यासाठी वसिम यानेही अल्पवयीन मुलावर खुनी हल्ला केला. वसिमचा खून करून बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाने पुन्हा तयारी केली. त्यासाठी त्याने पिस्तुलही आणले. शुक्रवारी रात्री चाकण येथे राहणारा वसीम सांगवी परिसरात आल्याची माहिती अल्पवयीन मुलांना मिळाली. यामुळे तो सूसवरून सांगवीत आला. मात्र तोपर्यंत वसीम निघून गेला होता. वसीम मिळाला नाही म्हणून अल्पवयीन मुलगा त्याचा नातेवाईक उमर याला शोधू लागला. मात्र तोही मिळाला नाही. वसिम आणि राजकिरण घुटे यांची मैत्री असल्याने त्याने घुटे याच्यावर गोळीबार केला.

दुसरा आरोपी अनभिज्ञ

गोळीबार घटनेतील दुसरा अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत होता. त्याला गोळीबार करणाऱ्या आरोपीने जयमालानगर येथे सोडविण्यास सांगितले. त्यानुसार तो दुचाकीवरून चालला होता. त्यास पाठीमागे बसलेल्या आरोपीने दुचाकी हळू करण्यास सांगितली. त्यानंतर त्याने गोळीबार केला. मात्र याबाबत दुचाकी चालविणाऱ्या आरोपीला पुसटशीही कल्पना नव्हती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

पूर्वनियोजित कटाची शक्‍यता

गोळीबार करणारा अल्पवयीन मुलगा याला रविवारी 18 वर्ष पूर्ण झाल्याने रविवारी तो सज्ञान झाला. अल्पवयीन असताना गुन्हा केल्यास शिक्षा होत नाही, हे त्याला माहिती असावे. यामुळे त्याने सज्ञाज होण्याच्या दोनच दिवस अगोदर कट रचून गोळीबार केला असावा, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.