Sangvi : विवाहितेशी लग्न करण्यासाठी दादागिरी करणाऱ्यास बेड्या; पतीलाही चाकूचा धाक दाखवत दिली धमकी

एमपीसी न्यूज – ‘पतीला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू,’ असे म्हणत विवाहितेला मारहाण केली. “मी ईथला भाई आहे’, असे म्हणत पतीलाही चाकूचा धाक दाखवत धमकी दिली. ही घटना पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि. 18) घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

इसाक उर्फ गुड्ड्या रज्जाक शेख (रा. जवळकर नगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या दोन वर्षापासून ते 19 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली. आरोपी शेख याने वेळावेळी फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. ‘पतीला सोडून तू माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू’, असे म्हणाला. त्यास महिलेने नकार दिला. त्यानंतर फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबलेल्या होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आला. त्यावेळी हातामध्ये चाकू घेऊन महिलेच्या पतीच्या अंगावर धावून गेला.

‘मी इथला भाई आहे’, असे बोलून शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेच्या कमरेत लाथ मारली. तसेच चापट मारून त्यांच्या कानाला जखम केली. आरोपीने एका शेजाऱ्याच्या फ्लॅटच्या दरवाजावर लाथा मारून कडी तोडून नुकसान केले. फिर्यादीच्या पतीस फोन करून शिवीगाळ करून धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.