Sangvi : शिवनेरी बस चालकाला शिवीगाळ; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज – पुणे-दादर मार्गावरून शिवनेरी बस घेऊन जात असताना अनोळखी इसमांनी बस चालकाला अडवून शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी बाराच्या सुमारास रावेत-औंध रोडवर रक्षक चौकाजवळ घडली.

मछिंद्रनाथ दादासाहेब मलमे (वय 29, रा. तिसंगी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मलमे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बस चालक पदावर नोकरी करतात. ते सोमवारी दुपारी पुणे-दादर (एम एच 06 / एस 9409) ही बस घेऊन दादरच्या दिशेने जात होते. रावेत-औंध रोडवर रक्षक चौकाजवळ बस थांबली असता अनोळखी आरोपींनी मलमे यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.