Sangvi : …म्हणून आईने केला पोटच्या चार वर्षीय चिमुकलीचा खून

... so the mother murdered the four-year-old Chimukali : कारण ऐकून थक्क व्हाल

एमपीसी न्यूज – चिमुकली त्रास देते म्हणून आईने मुलीचा गळा आवळून तसेच डोके भिंतीवर आपटून खून  केल्याची घटना  आज (सोमवारी, दि. 27) सकाळी अकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली आहे. मुलगी त्रास देत असली तरी खून करण्याचे नेमके कारण काय याचा तपास करताना पोलिसांच्या हाती वेगळीच माहिती लागली आहे. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

सविता दीपक काकडे (वय 22, रा. भालेकरनगर, पिंपळेगुरव. मूळ रा. पांगरी. ता. बार्शी. जि. सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपी आईचे नाव आहे.

याप्रकरणी पती दीपक अर्जुन काकडे (वय -25) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिशा दीपक काकडे (वय- 4) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक हे वाहन चालविण्याचे काम करतात. कामानिमित्त काकडे कुटुंब गावापासून शेकडो किलोमीटर दूर पुण्यात राहतात. काकडे कुटुंब आनंदी होते. आरोपी सविता आणि तिच्या सासूमध्ये खूपच मैत्रीचे संबंध होते.

सविताला एक सहा महिन्यांचा मुलगा देखील आहे. सासू-सुनेचे इतके पटत होते, की सुनेची डिलिव्हरी देखील सासूने सासरीच करण्याचा आग्रह धरला होता.

दोघींमध्ये चांगला एकोपा होता. सविताला सध्या सहा महिन्यांचा मुलगा आहे. तर चार वर्षांची मुलगी होती.

सविता हिच्या सासूचा मागील दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाला. सासूचा सोमवारी दशक्रिया विधी होता. या विधीसाठी घरातील सर्वजण आळंदी येथे गेले होते.

दरम्यान, घरात आरोपी सविता, तिचा सहा महिन्याचा मुलगा आणि मयत चार वर्षीय मुलगी असे तिघेजण होते.

सविताला सासूच्या दशक्रिया विधीसाठी नेले नाही, याचे प्रचंड दुःख तिच्या मनात होते. सासूचा मृत्यू झाल्यापासून सविताची मानसिक अवस्था देखील बरी नव्हती, असे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे.

घरातील सर्वजण दशक्रिया विधीसाठी गेल्यानंतर चार वर्षांची चिमुकली तिच्याकडे किरकोळ गोष्टींचा हट्ट करून त्रास देऊ लागली.

याचा सविताला राग आल्याने तिने स्वतःच्या मुलीचे डोके भिंतीवर जोरात आदळले. त्यानंतर तिचा मोबईल चार्जरच्या वायरने गळा आवळला. यातच त्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे. तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र, समोर आलेल्या या कारणांमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.