Sangvi: गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात दुर्गंधी; पिंपळे गुरव येथील प्रकार, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – सांगवीमधील पिंपळे गुरव परिसरात 60 फुटी रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आले आहे. मागील तीन महिन्यांपासून गटाराचे पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तक्रार देऊन देखील याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे., असे समजत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपळे गुरव येथील 60 फुटी रोडवरील चेंबरचे पाणी मागील सुमारे तीन महिन्यांपासून बाहेर येत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिक व दुकानदार यामुळे त्रस्त झाले आहेत.

याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार करून देखील यावर उपाय केला जात नाही. यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.