BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण

779
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या रागातून एकाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी अडीचच्या सुमारास सांगवी फेमस चौक येथील समीर चिकन सेंटरसमोर घडली.

राजेंद्र ऊर्फ राजू पवार असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम राजेंद्र पवार (वय 23, रा.समतानगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महेश खमसे, ओंकार उर्फ बाबू शिंदे, सुमित कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पवार हे गुरुवारी दुपारी समीर चिकन सेंटर येथे चिकन आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुकानमालक इब्राहिम अली आणि आरोपी यांच्यात भांडण सुरु होते. पवार हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली.

तसेच दुकानातील वजनकाटा आणि फरशी डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी त्यांच्या मुलाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.