Sangvi: विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाबरोबरच भाषिक कौशल्याचाही विकास करावा -उषा ढोरे

एमपीसी न्यूज – शहरातील नवोदित व अनुभवी कलाकारांना स्वतःचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिकेने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शहरात विविध ठिकाणी कवी संमेलनांचे आयोजन केले आहे. मराठी भाषा जागृत राहण्यासाठी भविष्यात देखील महापालिका नेहमीच प्रयत्न करीत राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच भाषिक कौशल्य विकास करावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका व बाबूरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त येथे शहरातील व महाविद्यालयातील कवींसाठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महाविद्यालयाचे मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. एम.एम. बागुल, इतिहास विभागप्रमुख सावित्री सावंत, प्राचार्य क्रांती बोरावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कवी नंदकुमार कांबळे यांनी हेल्मटची आवश्यकता याविषयावर मार्मिक कविता सादर केली. तसेच कवियत्री डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी सूर्य आणि पृथ्वी यांचा नातं सांगणारी ऋतू ही कविता सादर केली. कवियत्री मधुश्री ओव्हाळ यांनी मानवधर्म या कवितेद्वारे हरवत चालेल्या माणुसकीवर भाष्य केले. कवी सुरेश कंक यांनी आपल्या कवितेद्वारे 12 बलुतेदारांपैकी एक असलेल्या लोहारांचे जीवन लोकांसमोर सादर केले.

कवी शामराव सरकाळे यांनी तारुण्यातील प्रेमावर आधारित बस ही कविता सादर केली. देवेंद्र गावंडे यांनी भाजीवर एक हास्य कविता सादर करून उपस्थितांना खळखळून हसविले. कवी आय.के. शेख यांनी कडूनिंबाच्या झाडाखाली हि मराठी गझल सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

कवी आत्माराम हारे यांनी प्रेम कविता सादर केली. कवी निशिकांत गुमास्ते यांनी ग्रामीण व शहरी भागातील जीवन यांतला फरक दाखविणारी कविता सादर केली. कवी माधुरी विधाते यांनी संसार ही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कवी अरुण कांबळे यांनी ग्रामीण भागातील आईच्या जीवनावरील कविता सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. माया माईनकर यांनी केले. तर, आभार प्राचार्य डॉ. इमे.एम. बागुल यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.