Sangvi : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 11) नवी सांगवी येथे घडली. याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूषण रामदास गरुड (वय 28), रामदास गरुड (वय 65), सुलोचना गरुड (वय 60), दीपा विवेक पाटील (वय 30, सर्व रा. औंध, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दीपाली भूषण गरुड (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग मधुकर ठोंबरे (वय 32, रा. दिघी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी दीपाली यांना माहेरहून हुंडा आणण्यासाठी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला. सासरच्या या त्रासाला कंटाळून दीपाली यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सासरच्या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.