Sangvi : ऑनलाईन मोबाईल विकण्याच्या बहाण्याने दहा हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन शॉपिंग साईटमधून बोलत असल्याचे भासवून मोबाईल विक्रीच्या बहाण्याने एकाला दहा हजारांचा गंडा घातला. ही घटना नवी सांगवी येथे घडली.

मल्लिकार्जुन महादेव बिराजदार (वय 36, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याने मल्लिकार्जुन यांना फोन केला. atozshoppinghub.com मधून बोलत असल्याचे भासवून त्याला सॅमसंग कॉट्रो मोबाईल फोन 10 हजार रुपयांना विकायचा असल्याचे सांगितले. त्यासाठी 10 हजार 5 रुपये ऍक्सिस बँकेच्या atozshoppinghub pvt. ltd या नावाच्या खात्यावर भरण्यास सांगितले.

मल्लिकार्जुन यांनी सर्व रक्कम बँक खात्यावर जमा केली. पैसे जमा केल्यानंतर देखील आरोपीने मोबाईल फोन दिला नाही. तसेच मोबाईलसाठी भरलेली रक्कम देखील परत न देता मल्लिकार्जुन यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.