Sangvi : कारागिरानेच सलूनच्या दुकानातील एक लाख रुपयांसह सामानावर मारला डल्ला!

एमपीसी न्यूज – सलूनच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराने दुकानातील पैसे आणि सामानावर डल्ला मारला. कारागिराने एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी आठच्या सुमारास विशालनगर येथील कटिंग टाईम या दुकानात उघडकीस आली.

अली रफिक सलमानी (वय 32, रा. बालेवाडी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सदारत अली (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सलमानी यांचे विशालनगर, सांगवी येथे ‘कटिंग टाईम’ नावाचे सलुन दुकान आहे. या दुकानात आरोपी सदारत कारागीर म्हणून काम करत होता. रविवारी रात्री दहा ते सोमवारी सकाळी आठ या कालावधीत आरोपीने दुकानाच्या ड्रॉवर मधील पैसे, दानपेटी आणि पार्लरचे साहित्य असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.