Sangvi : पिंपळे गुरवमध्ये तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केली. ही घटना पिंपळे गुरव परिसरात शनिवारी (दि. 2) रात्री घडली.

कोमल भिमराव तुरेवाले (वय 22, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल यांनी राहत्या घरात शनिवारी रात्री ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

ही बाब लक्षात येताच तिच्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.