Sangvi : चोरटयांनी भरदिवसा मजुराच्या घरातून दागिने, रोकडसह सिलेंडर पळविला

एमपीसी न्यूज – कामासाठी बाहेर गेलेल्या एका मजुराच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गॅस सिलेंडर चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी पावणे एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

बबनराव नागोराव नावळे (वय 50, रा. क्रांती चौक, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबनराव हे मजुरीचे काम करतात. ते रविवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एक गॅस सिलेंडर असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी काम संपवून बबनराव घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.