_MPC_DIR_MPU_III

Sangvi : बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घराचे कुलूप तोडून बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 10) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

लक्ष्मण शिवाजी चव्हाण (रा. पिंपळे गुरव), मंगेश लांडे (रा. कासारवाडी), रोहन भागवत (रा. पिंपरीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रीतम प्रमोद जवाजीवार (वय 42, रा. खडकी, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगणमत करून फिर्यादी प्रीतम यांच्या जागेतील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेकायदेशीररित्या घरात घुसून जागेचा ताबा घेतला. तसेच प्रितम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.