BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : दोन पादचारी महिलांचे मंगळसूत्र हिसकावले!

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तनी हिसकावून नेले. या घटना सोमवारी (दि. 23) सायंकाळी नवी सांगवी परिसरात घडल्या.

अलका नामदेव गभाले (वय 51, रा. गणेशनगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी या भाजी घेऊन पायी घरी चालल्या होत्या. त्या गणेशनगर येथील एका फोटो स्टुडिओसमोर आल्या असता दुचाकी वरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाचे एक लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

त्यानंतर दुसऱ्या घटनेत दुचाकीवरील दोन चोरट्यांनी रूक्‍मिणी रेड्डी (रा. पिंपळे गुरव) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like