BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

213
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भैरवनाथ नगर, वैदवस्ती पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास सांगवी पोलिसांनी केली.

राहुल संजय सोनकडे (वय 19, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनाथनगरमधील जगताप पेट्रोल पंपाच्या मागे एक तरुण गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून राहुल याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा ऐवज मिळून आला.

त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार कसून चौकशी केली असता त्याबाबात त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.