Sangvi : नवी सांगवी परिसरात चोरी; 23 तोळे दागिने लंपास

0

एमपीसी न्यूज – नवी सांगवी परिसरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 23 तोळे 4 ग्राम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी क्रांती चौक, कीर्ती नगर, नवी सांगवी येथे उघडकीस आली.

संगीता अजित कांकरिया (वय 52, रा. क्रांती चौक, कीर्ती नगर, नवी सांगवी) यांनी याबाबत शनिवारी (दि. 17) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 8 ऑक्टोबर सकाळी अकरा ते 12 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले 5 लाख 81 हजार 500 रुपये किमतीचे 23 तोळे 4 ग्राम वजनाचे दागिने आणि 40 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 6 लाख 21 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.