Sangvi : घरातील दैनंदिन काम येत नसल्याने विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – घरातील दैनंदिन काम येत नसल्याने सासरच्यांनी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. ही घटना जानेवारी 2016 ते डिसेंबर 2017 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आनंद जनार्दन ढोरे, जनार्दन परशुराम ढोरे, शैलजा जनार्दन ढोरे, प्राजक्ता फेंगसे, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आनंद यांचा 2016 साली विवाह झाला विवाहानंतर सासरच्या मंडळींनी पीडित महिलेला संगणमत करून वेळोवेळी घरातील दैनंदिन कामकाज येत नसल्याच्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. पीडित महिलेला वेळोवेळी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.