BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा जाब विचारल्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज – कारमध्ये मोठ्या आवाज गाणी लावली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तसेच जाब विचारणा-या कुटुंबाने देखील गाणी लावणा-या कुटुंबाला मारहाण केली. ही घटना जवळकर नगर, पिंपळे गुरव येथे सोमवारी (दि. 17) दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान गणपती खोत (वय 50) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भास्कर खैरनार, नयन खैरनार, हिमांशू खैरनार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • खोत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खैरनार कुटुंबीयांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून खैरनार यांच्या घरासमोर मोठ्या आवाजात कारमध्ये गाणी लावली. याचा खोत जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तर भगवान खोत यांच्या डोक्यात वीट मारून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात भास्कर गौतम खैरनार (वय 48) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भगवान गणपती खोत, योगिता खोत, वैष्णवी खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खैरनार त्यांची कार वळवत असताना आरोपी त्यांच्या कारजवळ आले. काहीही कारण नसताना हाताने व लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये भास्कर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3