Sangvi : महादेव मंदिरासमोर तीन महिलांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – जुनी सांगवी येथील महादेव मंदिरासमोर प्रसाद (Sangvi) घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या तीन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 54 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : शहराचा पारा वाढणार; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जुनी सांगवी येथील महादेव मंदिरासमोर प्रसाद घेण्यासाठी रांगेत जात होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. त्याचबरोबर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या अन्य दोन महिलांचे देखील दागिने चोरल्याचे प्रकार घडले.

तीन घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण दोन लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले (Sangvi) असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.