Sangvi : फ्लॅटमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना बेड्या

एमपीसी न्यूज – फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार शनिवारी (दि. 28) दुपारी एकच्या सुमारास शितोळेनगर, जुनी सांगवी येथे घडला.

अलंकार प्रेम कांबळे (वय 23, रा. खडकी), विशाल बब्बा राजोडीया (वय 19, रा. खडकी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन श्रीहरी गुजर (वय 27, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एक वाजता फिर्यादी सचिन फ्लॅटला कुलूप लावून मेसमध्ये जेवण करण्यासाठी गेले. त्यानंतर, दोन्ही आरोपींनी सायकलच्या लोखंडी स्टॅन्डच्या सहाय्याने सचिन यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला.

कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.