Sangvi : सराईत गुन्हेगारांसह दोघांना अटक; घातक शस्त्रे जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Sangvi) खंडणी विरोधी पथकाने पिंपळे निलख येथून एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्टल, एक छऱ्याची बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे असे शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 6) करण्यात आली.

रोहित संतोष जाधव (वय 24, रा. सिंहगड रोड, पुणे), आदित्य बापू शिंदे (वय 23, रा. वाघोली, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी आणि विजय नलगे यांना माहिती मिळाली की, पिंपळे निलख येथे दोघेजण संशयितरित्या फिरत असून त्यांच्याकडे घातक शस्त्र आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत रोहित जाधव आणि आदित्य शिंदे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडपी घेतली असता त्यांच्याकडे 82 हजार 900 रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल, एक छ-याची बंदूक तसेच दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Sangvi) आला आहे. रोहित जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक फौजदार अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, रमेश गायकवाड, निशांत काळे, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, आशिष बोटके, सुधीर डोळस यांनी केली आहे.

Wakad : पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.