Sangvi : सांगवी परिसरात दोन घरफोड्या; सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरातील पिंपळे गुरव येथे दोन फ्लॅटमध्ये चोरी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 32 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सोमवारी (दि. 3) सकाळी दहा वाजता उकडकीस आला.

विश्वजित श्रीपती शिंत्रे (वय 32, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंत्रे यांची बहीण स्नेहल अमित कामते यांचे पिंपळे गुरव येथील घर 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने चोरून नेले.

तसेच चोरट्यांनी पिंपळ गुरव परिसरात गंगोत्रीनगर येथे राहणा-या विशाल शंकर रेंगडे यांच्या घराच्या दरवाजाच्या कडी कोयंडा उचकटून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, पान सुपारी, मुकुट असा चांदीचा विडा आणि रोख रक्कम चोरून नेली. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एक लाख 32 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.