Sangvi : चुलतीचा विनयभंग करणाऱ्या दोन पुतण्यांना अटक

चुलतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही पुतण्यांना अटक केली आहे. : Two nephews arrested for molesting aunty

एमपीसी न्यूज – चुलतीच्या घरी जाऊन तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या मुलाला मारण्याची धमकी दिली. याबाबत चुलतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही पुतण्यांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 5) रात्री साडेआठ वाजता सांगवी परिसरात घडला.

वडवाखर नांदिवली (ता. मुळशी) येथील दोन पुतण्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत चुलतीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पिडीत चुलती घरी एकटीच होती. त्यावेळी दोन्ही आरोपी पुतणे दारू पिऊन घरी आले.

जबरदस्तीने चुलतीच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

तिच्या मुलाला संपवल्या शिवाय राहणार नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही पुतण्यांना अटक केली आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.