Sangvi: पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; चौघांना मारहाण

Sangvi: Vandalism of vehicles by gangs out of prejudice; Beating four पिल्ले यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना तलवारी व कोयत्याचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने सात वाहनांची तोडफोड केली. तसेच चार जणांना मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि.14) रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथील शारदानगर परिसरात घडली.

राजकुमार आरसन पिल्ले (वय 25, रा. शारदा कॉलनी, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी चेतन अहिरे (रा. पिंपळे निलख) समीर शेख (रा. कस्तुरबा गांधी झोपडपट्टी, औंध) आणि त्याचे बारा अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात फिर्यादी राजकुमार पिल्ले, संतोष सिद्धेश्वर चौधरी (वय 21), चेतन गणेश जवरे (वय 20) आणि अजय भरत कांबळे (वय 24) हे चार जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र हे आपल्या घरी चालले होते.

त्यावेळी आरोपी चेतन अहिरे, समीर शेख व इतर बारा जण हातात कोयते व तलवारी घेऊन दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी पिल्ले यांच्या डोक्यावर व उजव्या पायावर वार केले.

पिल्ले यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना तलवारी व कोयत्याचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी आरडाओरडा करत परिसरातील सात वाहनांची तोडफोड केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.