Sangvi : 70 टक्के परतावा देण्याचे आम्हीच दाखवून नागरिकाचे सुमारे एक कोटीची फसवणूक

एमपीसी न्यूज- गुंतवणूक केल्यानंतर 70 टक्के परतावा देतो असे (Sangvi) आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार जून 2023 पासून आज पर्यंत फोनवरून ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.

याप्रकरणी 55 वर्षे नागरिकांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून इन्व्हेस्टमेंट इंडिया जयपुर राजस्थान या कंपनीतील राम शर्मा रुद्र प्रताप सिंग या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला फोनवरून संपर्क साधला. यावेळी डिमॅट अकाउंट हॅण्डल वरून त्यांनी फिर्यादीला गुंतवणूक करायला सांगून सुरुवातीला त्याचा परतवा ही दिला त्यामुळे फिर्यादी यांचा आरोपींवर विश्वास बसला.

Pune : तळवडे एमआयडीसीत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून विचारपूस

यानंतर आरोपींनी ट्रेडिंग संदर्भात IT BUKS (U.S) या कंपनीची (Sangvi) फ्रेंचायसी घेतली असून या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर फिर्यादीला 70 टक्के परतावा दिला जाईल असे सांगण्यात आले.

फिर्यादीला [email protected] वरून मेल करून ट्रेडिंग करण्यास सांगितले. यावेळी सुरुवातीला प्रॉफिटचा 30 टक्के रक्कम ही कंपनीला डिपॉझिट स्वरूपात देण्यात येते असे सांगून कमिशन म्हणून फिर्यादी यांच्याकडून 21 लाख 31 हजार सुरुवातीला घेण्यात आले.

त्यानंतर वेगवेगळे कारणे देत विविध बँक अकाउंट वरून खरेदी करून पैसे घेण्यात आले व त्या बदल्यात मिळणारा 99 लाख 92 हजार रुपयांचा नफा फिर्यादीला न देता त्यांचे आर्थिक फसवणूक करण्यात आली. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.