Sangvi : डॉ. आदित्य पतकराव यांना लंडन पार्लमेंटचा “जागतिक एक्सलन्स 2019 पुरस्कार” जाहीर

एमपीसी न्यूज – नवी सांगवी येथील दंत रोग चिकित्सक आदित्य डेंटल अ‍ॅड अ‍ॅडव्हान्स इनप्लांट सेंटरचे संचालक डॉ. आदित्य पतकराव यांना लंडन पार्लमेंटचा “जागतिक एक्स्लन्स पुरस्कार 2019” हा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. येत्या 13 जुलै रोजी हा पुरस्कार मेंबर ऑफ ब्रिटिश पार्लमेंट यांच्या हस्ते लंडन पार्लमेंट हाऊस येथे देण्यात येणार आहे.

विभागीय पातळीवर अतिउच्च वैद्यकीय सेवा देणार्‍या रुग्णालयाची एका सर्व्हेक्षणाच्या व पब्लिक वोटिंग च्या माध्यमातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात येवून इंटरनँशनल असोसिएशन यांच्या मार्फत हा जागतिक पातळीवरील पुरस्कार देण्यात येतो. 2019 वर्षाचा हा “जागतिक एक्सलन्स पुरस्कार 2019” बेस्ट डेंटीस्ट पुरस्कारासाठी डॉ.आदित्य पतकराव यांच्या “आदित्य डेंटल क्लिनीक अँड इनप्लांट सेंटर” ची निवड करण्यात आली आहे.

डॉ. पतकराव हे अंबाजोगाईचे रहिवासी असून औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालयातुन त्यांनी बी.डीएस. ही पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नवी सांगवी येथे “आदित्य डेंटल अँड इनप्लांट सेंटर”च्या माध्यमातुन दंतचिकित्सा आणि रुग्णसेवा सुरु केली. आपल्या या सेंटरमधुन डॉ.आदित्य यांनी जागतिक पातळीवरील अत्याधुनिक रुग्ण सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर दंत चिकित्सेमधील नवनवीन शोधप्रबंध तयार करून त्याचे जागतिक पातळीवरील विविध देशात आयोजित करण्यात आलेल्या दंत चिकित्सा परीषदेत वाचनही केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.