Sangvi : लग्नास नकार दिल्याने तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज – प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 14) रात्री साडेअकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली. दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय मृत तरुणी गेल्या तीन वर्षांपासून आयटी क्षेत्रात काम करणा-या तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होती. तरुणाचे नुकतेच लग्न ठरले होते. त्यामुळे तरुणी बेचैन झाली होती. ‘माझ्याशी लग्न कर’ असा तगादा तिने त्या तरुणाकडे लावला होता. मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तरुणीला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.