Sangvi : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या मुलाला मारहाण केली. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 2) दुपारी सव्वातीनच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

सतीश आनंदराव थोरात (वय 19, रा. जुनी सांगवी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी थोरात याने फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर धावून जाऊन त्याला मारहाण केली. मुलाचा मोबाईल पाडून नुकसान केले. फिर्यादी यांना अपशब्द बोलून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांच्या मुलाला ‘तुला तर मी खपवूनच टाकतो’ अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.