Sangvi: ‘त्या’ तरुणीची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या एका तरुणीला मुंबईतून अटक

Sangvi: A young woman arrested from Mumbai for defaming 'that' girl on social media काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका तरुणीचे फोटो वापरून तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले.

एमपीसी न्यूज– सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणाशी संबंधित एका तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केल्याबाबत 18 जणांवर विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणातील एका 22  वर्षीय आरोपी तरुणीला पोलिसांनी मुंबईमधून अटक केली आहे.

याप्रकरणी 24 वर्षीय पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात 16 जून रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका तरुणीचे फोटो वापरून तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले.

त्यानंतर पीडित तरुणीने याप्रकरणी 16 जून रोजी टिकटॉक, यु ट्यूब आणि फेसबुक अकाउंटधारक अशा 18 जणां विरोधात भारतीय दंड विधान कलम 500, 501, 509, 354, 354 (डी), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोशल मीडियावर तरुणीची बदनामी करणा-या एका टिकटॉक युजर तरुणीला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.