Sangvi : जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिममालक आणि ट्रेनरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे जिममध्ये साहित्य योग्य प्रकारे न ठेवल्याचे कारण देत व्यायाम करणाऱ्या एका युवकासह गोल्ड जिमचा मालक व दोन ट्रेनरवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

तेजश्री भास्कर मोरे (वय 26, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोल्ड जिमचे मालक सनी गरेवाल, मुकेश सुखानी, ट्रेनर मुकेश कथुरडे, ट्रेनर रिटा अडगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजश्री पिंपळे सौदागर येथील गोल्ड जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जात होत्या. 9 नोव्हेंबर रोजी जिममध्ये व्यायाम करताना जिममधील साहित्य (वजने व अन्य मशीन) नीट ठेवले नव्हते. त्यामुळे तेजश्री यांच्या पायाच्या घोट्याला फ्रॅक्चर झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.