Sangvi : सांगवीत श्री महालक्ष्मी सेवा भावी ट्रस्टच्यातर्फे धार्मिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज- – नवी सांगवीतील श्री महालक्ष्मी सेवा भावी ट्रस्टच्यावतीने 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत श्री महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठा सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चारदिवसीय कार्यक्रमात वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा, भजन, कीर्तन होणार आहे. याबाबतची माहिती श्री महालक्ष्मी सेवा भावी ट्रस्टने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चौगुले, जैवविविधता समितीच्या सभापती उषा मुंढे, माजी नगरसेवक शंकर जगताप, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेविका उषा ढोरे, नगरसेवक नवनाथ जगताप, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सागर आंगोळकर, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, चंदा लोखंडे, उद्योजक विजय जगताप, बीव्हीजी ग्रुपचे दत्तात्रय गायकवाड, हभप बब्रुवान वाघ महाराज आदी उपस्थित राहणार आहेत.

मंगळवार (दि. 12) दुपारी तीन वाजता महालक्ष्मी, श्री गणेश, मातृलिंग (महादेव), महासरस्वती यांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीमध्ये मुलींचे लेझिम पथक, लाठी-काठी व मर्दानी खेळ पथक , हलगी पथक, घोडे, उंट, महिला भजनी मंडळे सहभाही होणार असून भक्तजनांसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

बुधवार (दि. 13)सकाळी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी दीड वाजता सहयोगी महिलांचे भजन, सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘भारतीय संस्कृती आणि आदिशक्ती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

गुरुवार (दि. 14)सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांचे ‘महालक्ष्मी महात्म्य’ याविषयावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवारी (दि. 15)दुपारी बारा वाजता महालक्ष्मी, श्री गणेश, मातृलिंग (महादेव), महासरस्वती यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण कोल्हापूरच्या करवीर पीठाचे जगद्‌गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या संयोजनात स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, श्रीकांत चौगुले, उद्धव पटेल, सुरेश तावरे, दत्तात्रय चौघुले, सखाराम रेडेकर, अशोक दुर्गुळे, सत्यनारायण राठी, हनुमंत पाटील, डॉ. भास्कर कोळपकर, नरसिंह पाटील, बंडोपंत चौघुले, अरुण गळतगे, विश्वेश्वर धुरुपे, बाबूराव काळे, भीमाशंकर टोंगळे, ईश्वर मोरे, राजाभाऊ सूर्यवंशी, वसंत माळी, विजय मेनकुदळे, गणेश पाटकर यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.