CET Results : ‘एमएचटी-सीईटी’ परिक्षेत पुण्याची सानिका गुमास्ते व अनिश जगदाळे अव्वल 

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री साडेदहा वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ‘पीसीएम’ ग्रुपमधून पुण्याची सानिका गुमास्ते ही राज्यात प्रथम, तर ‘पीसीबी’ ग्रुपमधून पुण्याचाच अनिश जगदाळे हा राज्यात प्रथम आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘पीसीएम’ ग्रुपमध्ये पहिले पाच विद्यार्थी

सानिका गुमास्ते पुणे, सौरभ जोग – पुणे, वंशिता जैन – नगर, केतकी देशमुख – मुंबई, चैत्य वोरा – मुंबई आहेत तर, ‘पीसीबी’ ग्रुपमधून अनिश जगदाळे – पुणे, वर्षा कुशवाहा – पालघर, वेदांत जोशी – नांदेड, तनय मांजरेकर – मुंबई, देवांश शहा – मुंबई हे विद्यार्थी पहिल्या पाचमध्ये आहेत.

विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर त्याचे स्कोअरकार्ड उपलब्ध करण्यात आले आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

कोरोनामुळे एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा आक्टोबर महिन्यात घेण्यात आली. त्यानंतर एका महिन्याने निकाल जाहीर केला. या परीक्षेसाठी राज्यभरातून 5 लाख 42 हजार 431 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 86 हजार 604 जणांनी परीक्षा दिली. परीक्षेला उपस्थित राहण्याचे प्रमाण 71.27 टक्के इतके होते. तर कोरौनाभुळे व परीक्षा उशीरा झाल्याने या सीईटीला 1 लाख 55 हजार 827 म्हणजेच 28.73 टक्के गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. ही परीक्षा राज्यात 36 जिल्ह्यात 187 केंद्रांवर तर महाराष्ट्राबाहेर 10 ठिकाणी घेण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.