Maval News : माळेगाव बुद्रुक येथे स्वच्छता अभियान

  एमपीसीन्यूज  : मावळ तालुक्यातील  माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान राबवत  गावाचा परिसर स्वच्छ केला. ग्रामस्थांना ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी मोफत डस्टबीनचे वाटप करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संरक्षण तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

यावेळी  सरपंच रोहिणी  कोकाटे, उपसरपंच शंकर बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य बाळू खंडागळे, पोलिस पाटील अंकुश ठाकर,  अंगणवाडी सेविका जनाबाई आलम, मदतनीस मंदाबाई ताते, माजी सरपंच राजेश कोकाटे, माजी उपसरपंच सुनील ताते, ग्रामसेवक देशमाने, विभागप्रमुख जयदास ठाकर, संचालक गणपत ठाकर, बजरंग ठाकर, पंढरीनाथ आलम, सेवा वर्धिनी संस्थेचे माणिक गवळी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.