Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटकपदी संजय बावीसकर

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटकपदी तळेगाव दाभाडे येथील संजय बावीसकर यांची निवड जाहीर करण्यात आली. आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते बावीसकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे,पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व नगरसेवक संतोष भेगडे उपस्थित होते. संजय बावीसकर हे तळेगाव दाभाडे येथील पाच पांडव मंडळांचे संस्थापक असुन श्री शिवशंभु स्मारक समितीचे संस्थापक सदस्य आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात संघटनेच्या माध्यमातुन व आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून होणारा विकास कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.