Pimpri : ‘संजय भाऊ सॉरी’ हा फलक नव्हे, तर बनावट फोटो !

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक झळकला आहे. या फलकाची पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष जागेवर अशा प्रकारचा फलक लागलेलाच नसून बनावट फोटो तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल लागून 13 दिवस झाले. तरी राज्यात नवीन सरकार स्थापन होत नाही. सरकार स्थापनेचा घोळ सुरुच आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक झळकल्याचा एक फोटो हाट्सअॅपवर व्हायरल झाला. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

_MPC_DIR_MPU_II

मात्र या फोटोमागील सत्य जाणून घेतले असता हा फोटो बनावट असल्याचे उघडकीस आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजपाच्या एका नगरसेवकाने ‘संजय भाऊ आय अॅम सॉरी’ आणि पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेल्या फलकाचा फोटो व्हाट्सअॅपवर व्हायरल केला. त्यानंतर सर्वत्र या फोटोची चर्चा सुरू झाली. परंतु, त्यांनी पाठवलेला फोटो हा बनावट खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून संबंधित ठिकाणी अशा प्रकारचा कोणताही फलक नसल्याचे समोर आले आहे. शिवाय मागील काही दिवसांपासून तिथे कोणतीही जाहिरात लावण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे.

आता हा बनावट फोटो कोणी तयार केला याचा शोध वाकड पोलीस घेणार का, हे पाहावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.