_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Dabhade News : बाळा भेगडे यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज  –  संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी  विरुद्व राज्यातील महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस ) पक्ष समोर असताना आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या विजयाचे शिल्पकार सोलापूर प्रभारी माजी राज्य मंत्री बाळा तथा संजय भेगडे यांचा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार (दि 9) मुंबई येथे विशेष सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी या विजयाबद्दल बाळा भेगडे यांच्या संघटनात्मक कामाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदनही केले.

_MPC_DIR_MPU_II

प्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन, सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, राज्याचे संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी प्रमुख नेते,पदाधिकारी उपस्थित होते.

नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी याप्रसंगी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.