Sanjay Dutt Hospitalized: श्वासनास त्रास होऊ लागल्याने अभिनेता संजय दत्त रुग्णालयात दाखल

अभिनेता संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती. त्याची कोरोना अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह

एमपीसी न्यूज – नामवंत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला श्वसनास त्रास होऊ लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज (शनिवारी) दुपारी चारच्या सुमारास त्याला रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रुग्णालयात दाखल करताच 61 वर्षीय संजय दत्त याची कोविड-19 अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. त्याची स्वॅब टेस्टही घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल उद्या (रविवारी) सकाळपर्यंत येणार आहे.

संजय दत्त याने रात्री उशिरा ट्वीट करून आपल्या चाहत्यांना आपल्या प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली. ‘प्रत्येकाला मी खात्री देतो की माझी प्रकृती चांगली आहे. मी सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे आणि माझा कोविड -19 अहवाल निगेटीव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांची मदती व काळजी यामुळे मी एक-दोन दिवसांत घरी असेन. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी हात जोडून हात धन्यवाद’. असे संजय दत्तने म्हटले आहे.

लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. व्ही. रविशंकर यांनी सांगितले की, रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या संजय दत्त यांची ऑक्सीजन लेवल कमी जास्त होत होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही. संजय दत्त यांना सध्यातरी कोविड वोर्डात भरती करण्यात आलेलं नाही. संजय दत्त यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या इतरही काही चाचण्या करण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.