Navi Sangvi : श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय जगताप यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – नवी सांगवी येथील श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय गणपत जगताप यांची; तर उपाध्यक्षपदी सुरेश तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे संचालक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संजय जगताप व सुरेश तावरे यांचा सत्कार करण्यात आला.

बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक तथा अध्यासी अधिकारी बी टी लावंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत जगताप व तावरे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे संचालक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संजय जगताप व सुरेश तावरे यांचा सत्कार करण्यात आला.

  • यावेळी संचालक सूर्यकांत गोफणे, शिवलिंग किनगे, राजेंद्र राजापुरे, दत्तात्रय चौगुले, शशिकांत कदम, गणेश करंजकर, उद्धव पटेल, अभय नरडवेकर, मनोहर ढोरे, मारुती तरटे, संतोष देवकर, अंकुश जवळकर, संगीता कांकरिया, राजश्री जाधव, शिवाजी शिंदे व वसंत गुंड उपस्थित होते.

ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, कर्जपुरवठा वाढवणे व थकीत कर्ज वसुलीला प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय जगताप यांनी या सभेमध्ये सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.