Pimpri : झोपडपट्टी सुरक्षादलाच्या वतीने पुरंदर हवेली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात मोठया मताधिक्याने निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांचा झोपडपट्टी सुरक्षादलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते महात्मा फुले पगडी, उपरणे व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते  विजय कोलते, सुदाम इंगळे,  नगरसेवक गणेश ढोरे, अर्चना कामठे, प्रविण कामठे, संजय हरपळे, संतोष पवार, रमेश नवगुळे, रोहित राऊत, सुनील साळवे, नंदू हरपळे, सतीश कांबळे, मछिंद्र कामठे, सतीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांनी आपल्या सत्कारपर भाषणात सांगितले की पुरंदर ग्रामस्थांच्या अडी अडचणी समजाऊन घेऊन कोणी गटातटाचे राजकारण न करता हरपळे, कामठे या ग्रामस्थांनी संघ ताकदीने गावाचा
विकास करून घ्यावा, त्या विकासात चार पाऊलांनी आपण पुढे राहू, झोपडपट्टी वासियांच्या प्रश्नांसाठी आपण आमदार या नात्याने नेहमीच सहकार्य करू.

झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांनी सांगितले की झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मनापासून या निवडणुकीत काम करून विजय खेचून आणला. हवेली पुरंदर तालुक्यातील शासकीय जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देऊन सातबारावर नोंद करावी, असे आवाहन भगवान वैराट यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.