Pune : राज्यघटनेची प्रत जळल्याप्रकरणी खासदार संजय काकडेंना नगरसेवकाचे निवेदन

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यघटनेची प्रत जाळण्याचे कृत्य करणाऱ्या श्रीनिवास पांडे व त्याच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष व नगरसेवक राहुल भंडारे आणि बोपोडी औंध रोड संविधान संरक्षण समितीचे संजय कांबळे, रणजीत केदारी, मनोज सूर्यवंशी, उदय धेंडे, विजय जाधव, गणेश कांबळे, अक्षय केदारी आदींनी आज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना निवेदन दिले आहे. 

यावेळी संजय काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जी यांना याप्रकरणी आजच पत्र पाठवून राज्यघटनेची प्रत जाळणाऱ्या या इसमांवर त्वरित कारवाई करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार असल्याचे आश्वसन दिले.
राज्यघटना ही आपल्या लोकशाही राष्ट्राचा आत्मा आहे. आपल्या देशात राज्यघटनेचे स्थान सर्वोच्च आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो. अस देखील संजय काकडे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.