Patra Chawl Case : संजय राऊत यांची 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात रवानगी

एमपीसी न्यूज – पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. या सर्वांमध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषध देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना काहिसा दिलासा मिलाला आहे. पत्राचाळ जमीन प्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेना खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यामुळे त्यांना आता जामीनासाठी अर्ज करता येणार आहे.

पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नऊ तास संजय राऊत यांची चौकशी केली होती त्यानंतर 31 जुलै रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्याची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आली होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी (Patra Chawl Case) सुनावली. आता राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे. या सर्वांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे राऊतांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना आता जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय न्यायालयाने राऊतांना घरचे जेवण आणि औषधे देण्यासही परवानगी दिली आहे.

वर्षा राऊत यांचीही चौकशी

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला असून विविध अकाउंटवरुन वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर एक कोटीपेक्षा जास्त पैसे आल्याचा आरोप केला जात आहे. पत्राचाळ प्रकरणातील या अवैध पैशांतून त्यांनी अलिबागमध्ये जमीन घेतल्याचा आरोप केला जात असून ईडीने त्यांना समन्स बजावल्यानंतर त्या चौकशीसीठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.