Sanjay Raut: बाळासाहेबांना त्रास दिला तेच आता त्यांच्या क्लिप दाखवतायत- राऊत

एमपीसी न्यूज – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची एक क्लिप राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर करून शिवसेनेला जुन्या भूमिकेची आठवण करून दिली होती.. त्यालाच आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणी त्रास दिला तेच आता त्यांच्या क्लिप फिरवत आहेत अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा वरून पुन्हा एकदा शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मशिदीवरील भोंगे याच्या मुद्द्यावरून विकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

Nigdi News: देशाची फाळणी अपरिहार्य होती – डॉ. बालाजी चिरडे

संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून केलेली क्रांती शब्दात व्यक्त करता येणार नाही. बाळासाहेबांनी जर हातात कुंचला घेतला नसता तर आजची शिवसेना उभी राहिली नसती.
मी आता जी पेटवापेटवी ची भाषा करत आहात. आमचं तर अख्ख आयुष्यच पेटवापेटवीत गेले, असा टोला देखील त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Indian Army: सशस्त्र सेना दलात दाखल होऊन मातृभूमीचे रक्षक बनायचं आहे?

संजय राऊत म्हणाले गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रात कोणालाही भोंग्यांचा त्रास झाला नाही. परंतु आपला भाऊ मुख्यमंत्री झाला की लगेच त्रास सुरू झाला असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

 

संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा देखील समाचार घेतला. ते म्हणाले महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री हवाय हे जनता ठरवेल. मात्र शिवसेनाच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवेल.

मनोहर जोशी यांच्या रूपाने बाळासाहेबांनी देखील ब्राह्मण मुख्यमंत्री दिला होता, असे देखील राऊत म्हणाले.

वादाची पार्श्वभूमी

मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची क्लिप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेअर केली असून त्या माध्यमातून शिवसेनेला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. त्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे शिवसेना नेत्यांना आता मोठ्या प्रमाणात सारवासारव करावी लागत आहे. त्यात त्यांना कितपत यश येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.