Sankarshan on Wari : यंदाची पंढरीची वारी झाली नाही, तरी पुढच्या वर्षीची नक्की होऊ दे…

This year's Pandhari Wari is not over, but let it happen next year for sure ... संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पंढरीच्या विठूरायावर सुंदर कविता ऐकवली आहे.

एमपीसी न्यूज – ‘आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती’, अशी परिस्थिती यंदा करोनाच्या साथीमुळे शक्य नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक वैष्णवाचा जीव आज पंढरीच्या विठुरायाला भेटता न येण्याचे दु:ख मनाशी बाळगत आहे. यंदा पालख्या पंढरपूरला एस.टी. महामंडळाच्या गाडीतून रवाना झाल्या आहेत. एक नवा पायंडा या निमित्ताने पडला आहे.

उद्या देवशयनी आषाढी एकादशी. सातशे आठशे वर्षे चालत आलेली वेगवेगळ्या संतांच्या पालखीची, वारीची परंपरा यंदा करोनाच्या साथीमुळे खंडित झाली. याचे प्रत्येक विठुभक्ताच्या मनात शल्य आहे. पण परिस्थितीच भीषण आहे. आणि आपण एवढा संयम राखणे आवश्यकच आहे. पण विठ्ठलभक्तीपासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. अभिनेता संकर्षण क-हाडेने पंढरीच्या विठुरायावर सुंदर कविता लिहिली आहे. एक डोळस कवी असलेला संकर्षणने फक्त वारीत गेल्यानेच विठुराया भेटतो असे नाही हे किती सहजपणे सांगितले आहे.

संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पंढरीच्या विठूरायावर सुंदर कविता ऐकवली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘पंढरीच्या विठुराया… पाहा.. नीट ऐका.. तुम्हालाही ह्या रुपात पांडुरंग दिसला असेल तर; नक्की कळवा ..!! रामकृष्ण हरी..’ असे कॅप्शन दिले आहे.

आषाढी एकादशीला पंढरपुरात आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगर मधून मुक्ताबाईंची, शेगावहून गजानन महाराजांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. मृगाच्या मुहूर्तावर पडलेल्या पावसामुळे तयार झालेली इवली इवली रोपं शेतात रुजवून बळीराजा विठुरायाच्या ओढीने पंढरपूरला जातो. वारी करुन देवाचे दर्शन घेऊन परत येतो आणि वाढलेल्या पिकाचे पुढचे कोडकौतुक पुरवायला तयार होतो. वारीचे पुण्य पुढील वर्षभर साठवायचे असते. तसेच शेतातील धान्यदेखील पुरवायचे असतो. पण यंदा वारीचे पुण्य वारक-यांना लौकिकार्थाने गाठी बांधता आले नाही तरी पुढच्या वर्षी मात्र ही महामारी संपून नि:शंक मनाने पंढरीला जाता येऊ दे हीच प्रत्येकाची मनोमन इच्छा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.