Photo Feature: माऊलींच्या पालखीचे हरिनाम गजरात प्रस्थान; कोरोनामुळे मोजक्या वारकऱ्यांची उपस्थिती

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi prasthan sohala.

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाकडून लागू केलेल्या निर्बंधाचे व नियमांचे काटेकरपणे पालन करीत मोजक्याच वारकरी भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज, शनिवारी (दि.१३) दुपारी साडेचारच्या सुमारास विठुरायाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले.  यावेळी ‘माउली माऊली’च्या जयघोषाने मंदिर परिसरासह अलंकापुरी दुमदुमून गेली होती. प्रस्थानापूर्वी अमोल गांधी, महेश जोशी, राजाभाऊ थेटे, योगेश चौधरी यांनी श्रींच्या पूजेचे पौरोहित्य केले. (सर्व छायाचित्रे जिग्नेश मिस्त्री व देवदत्त कशाळीकर)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.