Talegaon Dabhade News : संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छता याबाबत समाजजागृती करणारे संत गाडगे महाराज यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच नगरपरिषदेतील स्वच्छतादूत यांचा सत्कार करून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये साजरी करण्यात आली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद स्वागत प्रांगणामध्ये आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कैकाडी समाजाचे उपाध्यक्ष लक्ष्मण माने, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका शोभा भेगडे,मंगला जाधव,उपमुख्यधिकारी सुप्रिया शिंदे,रसिका लामखेडे, विभावरी वाणी,आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले,मयुर मिसाळ, नगर परिषदेतील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांनी संत गाडगेमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन केले. या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमानंतर नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये आरोग्य समितीकडून नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचा ‘स्वच्छता दूत’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे, अरुण भेगडे पाटील, अरुण माने, नगरसेविका शोभा भेगडे, मंगल जाधव, काजल गटे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे,दिलीप गायकवाड, मयूर मिसाळ,प्रमोद फुले आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्री संत गाडगेमहाराज यांच्या जीवनाबाबत तसेच स्वच्छतेबाबत मान्यवरांनी विचार व्यक्त केले.