Nigdi : निगडीतील व्यापारी संकुल चौकाचे ‘संत जलाराम चौक’ असे नामकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणा-या प्राधिकरणातील व्यापारी संकुलातील मुख्य चौकाचे ‘संत जलाराम चौक’ असे नामकरण करण्यात आले. या नामफलकाचे अनावरण नॉव्हेल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे व ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते आज (मंगळवारी)करण्यात आले. 

यावेळी  प्राधिकरण  व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमैय्या, कार्याध्यक्ष हेमंत मिश्रा,उपाध्यक्ष गिरिश शेट्टी, भाजपा युवा मोर्चाचे अनुप मोरे, रोहिणी सोमैय्या,कमलेश जैन, दयालसींग चंदानी, जयंतीभाई राठोड, लक्ष्मी  मीत्तल, राम नलावडे, दिनेश सोळंकी, मानसिंग पाटील मनोहर कुलकर्णी उपस्थित होते.

अमित गोरखे म्हणाले, संत जलाराम गुजरातमधील मोठे संत होते. त्यांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला होता.  राजकोटमध्ये मोठे जलाराम मंदिर आहे. या मंदिराला देशभरातून लाखो लोक दररोज भेट देतात. त्या मंदिरात दोनपेटी नाही, हे सर्वांच महत्वाचे आहे. अनुराधा गोरखे यांच्या पुढाकारातून प्रभाग समितीच्या बैठकीत याबाबत पुढाकार घेण्यात आला होता.

असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमैय्या म्हणाले,  असोसिएशनतर्फे  व्यापारी संकुलातील मुख्य चौकाचे ‘संत जलाराम चौक’ असे नामकरण करण्याचा विनंती आम्ही केली होती. त्यानुसार ‘अ’ प्रभागाच्या समितीत ठराव समंत करण्यात आला होता. त्यासाठी तत्कालीन उपमहापौर शैलजा मोरे, तत्कालीन प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका शर्मिला बाबर यांनी सहकार्य केले होते. ठरावाला विद्यमान अध्यक्षा गोरखे यांनी मूर्त स्वरुप दिले. त्यानुसार आज प्राधिकरणातील व्यापारी संकुलातील मुख्य चौकाचे ‘संत जलाराम चौक’ असे नामकरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.