Alandi News : आळंदीमध्ये संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : आळंदी मधील हराळै वैष्णव समाज धर्मशाळेत (Alandi News) श्री संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाविकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

Pune Crime : पत्ता विचारून पाया पडण्याचा बहाण्याने चोरी करणारा गजाआड

सकाळी 10 वाजता येथे संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर  ह.भ.प. नितीन महाराज नांदेडकर यांचे कीर्तन झाले. (Alandi News) धर्मशाळेचे अध्यक्ष राजू कांबळे यांच्या वतीने 12 ते 2 यावेळेत महाप्रसादाचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी आळंदी शहरातील विविध मान्यवर, वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी, भाविक भक्त, समाज बांधव व धर्मशाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.  याबाबतची माहिती तुषार नेटके यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.