Nigdi : संत तुकाराम महाराज पालखी स्वागत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून करावे

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात दिनांक 11  जून  2023 रोजी संत तुकाराम महाराज पालखी दाखल होत असून पिंपरी-चिंचवड महानगरपलिका ह्यांच्या वतीने हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून पालखी स्वागत करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आयुक्ताकडे केली आहे.

Maval SSC Result : मावळ तालुक्याचा निकाल 94.73 टक्के; 30 शाळांचा 100 टक्के निकाल

पंढरपूरमधून हजारो वारकरी पायी वारी करत असून त्याचा उत्साह वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने दखल घ्यावी. हेलिकॉप्टर उपलब्ध करून महानगरपालिकेच्या वतीने निगडी (Nigdi) भक्ति शक्ति ते आकुर्डी मुक्काम या ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करावे.

तसेच, वारकरी बांधवांना अनुदान स्वरूपात औषधे व इतर सुख सुविधा उपलब्ध करून मंडप व स्वागत कक्ष महानगरपालिकेककडून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे. सामाजिक संघटना, सेवा भावी संस्था, कार्यकर्ते नगरसेवक, आमदार, खासदार सर्व घटकांना बरोबर घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने हजारो वारकरी बांधवांना रेनकोट वाटप तसेच इतर सुविधा उपलब्ध कराव्या. मंडप व स्वागत कक्ष नियम अटी शर्ती शिथील करण्यात याव्यात.

मंडप व स्वागत कक्ष परवाना मिळण्यासाठी पोलीस सुरक्षा कारणास्तव नाकारण कार्यकत्यांना वेठीस धरले जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकारी ह्यांना सुचना करून मंडप स्वागत कक्ष नियम अटी शर्ती शिथील कराव्यात. निगडी भक्ति शक्ति ते निगडी बस स्टॉप परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून त्या ठिकाणी बुजविण्याचे काम करण्यात यावे. तसेच राडारोडा पडला आहे तो उचलला जावा. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल खालील परिसर स्वच्छ करण्यात यावा, जेणेकरून वारकरी बांधवांना जागा वापर करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

तसेच मधुकर पवळे उड्डाण पूल ते भक्ति शक्ति उड्डाणपूल येथील निगडी (Nigdi) गावठाण येथील भुयारी मार्ग काम संपुर्ण झाले असून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरु होण्यापूर्वी भुयारी मार्ग नागरिकांना सुरु करण्यात यावा. जेणेकरून वाहतूक कोडी होणार नाही. तसेच रस्ता ओलांडून जाण्यासाठी-येण्यासाठी कसरत करावी लागणार नाही.

संत तुकाराम महाराज पालखी मागांवरील सर्व अतिक्रमण काढण्यात यावे, वारकरी बांधवांना चालण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी. जड वाहनांना भक्ति शक्ति उद्यान पूल ते आकुर्डी मुक्काम ह्या पालखी मार्गावर वाहतूक बंदी घालण्यात यावी तसेच ट्रॅव्हल्स बस ह्यांना सुद्धा संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर बंदी घालण्यात यावी, तसेच सिग्नल यंत्रणा वेळ वाढविण्यात यावा, रस्त्यावर पांढरे पट्टा मारण्यात याव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.