Pune Crime News : सराईत आरोपी तितल्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पुण्यातील वारजे माळवाडी व उत्तमनगर पोलिस ठाण्यातील फायरींग, दोन खूनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार असलेला तितल्या अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याला शस्त्रासह पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या दरोडा (Pune Crime News) विरोधी पथक एकने शुक्रवारी (दि.5) केली आहे.

आकाश उर्फ तितल्या अनिल मुलगे (वय 21 रा.वारजे, मुळगाव गुलबर्गा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी तितल्या हा सात महिन्यांपासून फरार होता.शुक्रवारी वारजे माळवाडी येथे गस्त घालत असताना दरोडा विरोधी पथकाला तितल्या हा वारजे पुलाजवळील चर्चजवळ थांबला असल्याची माहीती मिळाली.यावरून पोलिसांनी तेथे जाऊन खात्री करून सापळा रचून  तितल्याला ताब्यात घेतले.

यावेळी त्याची अंग झडती घेतली असता लोखंडी कोयता पोलिसांनी (Pune Crime News) जप्त केला.पोलिसांनी अधिक तपास केला असता तितल्या याच्यावर वारजे माळवाडी व उत्तमनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे तसेच फायरींगचे असे दोन गुन्हे दाखल आहेत.याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.